सह्याद्री न्यूज : किरण घाटे
चंद्रपूर, (११ ऑक्टो.) : काल रविवार दि. 10 ऑक्टाेंबरला जिल्हास्तरीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार जगदीश योगराज मडावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा. केंद्र आंबेशिवणी, पंचायत समिती गडचिराेली यांना मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात प्रदान करण्यांत आला. हा पुरस्कार त्यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ. तसेच प्रोफेसर, टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लाँइज विंगच्या वतीने देण्यात आला. जगदीश मडावी यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी आज पावेताे शाळेत अनेक उपक्रम राबविले आहे.
covid-19 च्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी केलेल्या कामाची ही एक पावतीच आहे. दरम्यान त्यांना काल मिळालेल्या पुरस्कार बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गडचिराेली: जगदीश मडावी ठरले जिल्हास्तरीय पुरस्काराचे मानकरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 11, 2021
Rating:
