सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (११ ऑक्टो.) : लखिमपुर खिरी शेतकरी हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ व कॉग्रेस नेत्या प्रयिंका गांधी यांना अटक केल्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्याला पाठींबा देत मुदखेड सह बारड, निवघा, माळकोठा येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साथ देत राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभागी होत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून लखिमपुर खिरी शेतकरी हत्याकांड निषेध नोंदवला आहे.
मुदखेड तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लखिमपुर उत्तर प्रदेश च्या घटनेत कांग्रेस नेतृत्व प्रियंका गांधी यांना अटक केली म्हणून निषेध केला. शेतकरी आंदोलन ला पाठिंबा साठी बंद पुकारला होता. शहरातील मोंढा शिवाजीनगर चे मुख्य मार्केट संपूर्ण बंद होते बंदला व्यापाऱ्यांनी १०० टक्के शंभर टक्के पाठिंबा दिला होता. आडत व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी नगरसेवक संजय आवुलवार, मार्केट कमिटीचे संचालक संदीप पाटील. शंकर राठी, खुर्शीद शेठ मुजीब पठाण, गौससेठ, बबलू सेठ किराणा वाले, ज्वेलर्सचे गजानन कदम आदी व्यापाऱ्यांनी आपले आपले दुकान प्रतिष्ठान बंद ठेवले आणि सहकारी बंधूंना बंदमध्ये सामील करून घेतले होते तालुका काँग्रेस अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मणराव देवदे, माधव कदम, तालुका शिवसेना प्रमुख संजय पाटील कुरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर, शेख जब्बार, नितीनचौदंते, खदिर खुरेशी, फेरोज मुलतानी, शेख बुराण, शहर प्रमुख सचिन माने व सचिन चंद्रे, बंदेअली खान, बालाजी गोडसे, करिम खान, इमरान सेठ, प्रताबराव देशमुख बारडकर, नामदेव बिच्चेवार आदी प्रमुख निवेदन देताना उपस्थित होते. सुत्र संचालन संजय कोलते यांनी केले. महाआघाडी च्या बंदला भाजप कडून विरोध झाला त्यांची दहा पंधरा दूकान प्रतिष्ठान चालू होते पण इतर सर्व बंद मध्ये सहभागी झाले.बंद यशस्वी झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवुन मुदखेड येथील व्यपारी वर्गानी सहकार्य कले.
लखिमपुर खिरी शेतकरी हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 11, 2021
Rating:
