सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (५ ऑक्टो.) : मारेगाव तालुक्यामध्ये होणाऱ्या सततच्या पावसांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी व संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीला घेऊन शिवसेना तालुका अध्यक्ष संजय भाऊ आवारी यांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मारेगाव तालुका प्रमुख तथा पं स उपसभापती संजय भाऊ आवारी, मयूर ठाकरे (युवासेना तालुका प्रमुख), सुनीलभाऊ गेडाम (तालुका संघटक), सुरेशभाऊ पारखी (शिवशक्ती भीमरावती संघटक), जीवन काळे (उपतालुका प्रमुख), किसन पा मत्ते (विभाग प्रमुख),
सुभाषभाऊ बडकी (मा.नगर सेवक),अभय चौधरी (शहर प्रमुख), चंद्रशेखर थेरे (उपविभाग प्रमुख)
दुमदेव बेलेकर, तुळशीरामजी चांदेकर, गोपाळ खामनकर, उपतालुका प्रमुख राजाभाऊ मोरे यांची उपस्थिती होती.
मारेगाव तालुका हा कोरडवाहू भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस व तूर ही पिके येतात. या वर्षीच्या सतत येणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक हे पुर्णताहा नष्ट झालेले आहेत.
त्यास लागलेला खर्चसुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शिवाय जो काही कापूस आता निघायचा होता. तो पूर्णपणे खराब झालेला असून, त्याला अंकुर फुटलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५०००/- हजार रुपये मदत जाहीर करावी व संपूर्ण मारेगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या - शिवसेनेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
