नांदेड वनविभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र देगलूर विभागाकडून मौजे केरूर येथे वन्यजीव सप्ताह साजरा

सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (५ ऑक्टो.) : बिलोली तालुक्यातील मौजे केरूर येथील जिल्हा परिषद शाळेत वनपरिक्षेत्र देगलूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने ता.०१ ते ०७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने ता.०५ ऑक्टोबर रोजी सदरील वन्यजीव सप्ताह मौजे केरूर येथे घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या हस्ते परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले, त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांतुन वन्यप्राणी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आले, यामध्ये अनुक्रमे कु. शेख गुप्तागी प्रथम, कु. शेख माहीम द्वितीय तर कु. निकिता जाधव ही तृतीय आली. निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल हिवरे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना देगलूर वनविभागा कडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी वनरक्षक गजानन कोतलवार व गिरीश कुरडे यांनी वन्यपजीव व वन्यप्राण्यांच्या बाबतीत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी परिमंडळ अधिकारी शंकर गेडाम, शेख फरीद, ज्ञानेश्वर मुसळे, कुंभारे, सौ गायकवाड, वन सेवक सुभाष नाईक, तेजराव धाणेकर, तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post