चिंचाेली प्रकल्पग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई व नाेकऱ्या नाही - बीआरएसपीने दिला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (५ ऑक्टो.) : चिंचोली प्रकल्पग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई व नाेक-या मिळाल्या नाही त्यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याबाबत बीआरएसपी जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी वेकोलीचे कंमड यांना एक निवेदन सादर केले आहे .
वेकोलि तर्फे अधिग्रहण प्रकिया प्रमाणे section 11 लावून ७ वर्षे झाले तरी चिंचोली रीकास्ट प्रकल्पाचे 205 प्रकल्पग्रस्त शेतक-यांना नोकऱ्या आणि जमिनीच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागत आहेत. त्यामुळे वेकोली चे CMD श्री मनोज कुमार यांनी प्रकल्पग्रस्तांना लवकऱात लवकर रोजगार देऊन त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवावा अन्यथा बी.आर.एस.पीच्या वतीने तिव्र आंदोलना करण्यांत येईल असा इशारा सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला आहे.
अधिग्रहणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यावर का रोखली गेली? गेल्या सात वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार आणि प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल देखिल त्यांनी आजचा बैठकीत उपस्थित केला.
चिंचाेली प्रकल्पग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई व नाेकऱ्या नाही - बीआरएसपीने दिला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
