"पडवणे वाडी" येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
रत्नागिरी, (५ ऑक्टो.) : रत्नागिरीतील, गणपती पुळे नजीक - मालगुंड (कवी-केशवसूत स्मारक) शेजारील "पडवणे वाडी" ही वरवडे (भंडारवाडा) या गावाचे मुलभूत अंग आहे आणि प्राचीन काळापासूनची प्रस्थापित आहे. परंतु ह्या "पडवणे वाडी" कडे आता सर्वांचाच दुर्लक्ष होत आहे. पडवणे वाडीतली खाडी ही केसपुरची खाडी म्हणून ओळख होती, आता पडवणेखाडी म्हणून आताची पिढी ओळखते ही "पडवणे वाडी" खाडी आणि समुद्र याचे एक मध्यबिंदू आहे. याच "पडवणे वाडी" ची काय दशा होत आहे, समुद्रातील ताणामुळे लाटांच्या मार्याने पडवणे वाडी पुढून आणि मागुन दोन्ही कडून ही कोणता ही संरक्षण बांध नसल्याने, निवल वाळूचा तट खाडीच्या पुराने व समुद्राने जवळ जवळ १५ फुट यंदा जमिनीचा भाग फुटून वाहून गेला. त्यामुळे येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. पडवणे वाडीतील रहिवासी सरकारच्या मदतीच्या आशेकडे डोळे लाऊन आहेत कारण वाडीला संरक्षण बांधारा नसल्याने पडवणे वाडी पुर आणि समुद्र लाटांनी दिवसेंदिवस वाहत चालली आहे. प्रशासन लोकप्रतिनिधी चे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत असून, येथील झालेल्या हाणी ला जबाबदार कोण? असा सवाल येथील नागरिक सु बा सरपडवळ यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.
"पडवणे वाडी" येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली  "पडवणे वाडी" येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.