सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
कळंब, (५ ऑक्टो.) : भारतीय पिछडा ओबीसी संघटना, ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने कळब तालुक्याची बैठक तालुका अध्यक्ष गायत्री ताई नवाडे यांचे घरी पेट्रोल पंपा जवळ घेण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते तर, प्रमुख अतिथी विलास काळे. संघटक ज्ञानेश्वर रायमल जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत, राज्य कोषाध्यक्ष भानुदास केळझरकर, जिल्हा संघटक अशोक मोहुरले, समन्वयक किशोर थोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ओबीसीच्या जागृतीच्या प्रक्रियेत आत्मसन्मानाची लढाई आपण लढणे फार महत्त्वाचे आहे.
ओबीसीची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे,
ओबीसी प्रमाणे रीजर्वेशन इं प्रोमोशन मध्ये स्थान मिळाले पाहिजे, ओबीसीचे यवतमाळ जिल्ह्यात 14 चे 17 टक्के आरक्षण केले त्याबद्दल शासनाचे आभार कोणते आरक्षण 19% करण्यात यावे. या आशयाची भूमिका उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माणिकराव केवटे. चंदूभाऊ चांदोरे, रमेशभाऊ मेहेत्रे, नीलिमा अरविंद हजारे, अर्चना प्रवीण हजारे, ललिता सुरेश ओंकार, राज्य संघटक प्राध्यापक सविताताई हजारे, तालुका अध्यक्ष गायत्री नवाडे, समन्वयक अशोक उमरतकर, प्रसिद्धी प्रमुख रुस्तम शेख हे उपस्थित होते. या प्रसंगी गायत्री नवाडे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
ओबीसी जागृतीच्या प्रक्रियेत आत्म विश्वास वाढवण्याची गरज - डॉ ज्ञानेश्वर गोरे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
