वणी-राजूर-भांदेवाडा एसटी बस सुरू करण्याची मागणी


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (७ ऑक्टो.) : तालुक्यातील मोठं गाव व तालुका ठिकाणापासून जवळ असल्याने पहिली पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेण्यासाठी तालुका ठिकाण असलेल्या वणी शिवाय राजूरच नाही तर बोदाड, भांदेवाडा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नाही. परंतु इथे एसटी बस येतच नसल्याने अनेकांना शिक्षणापासून वंचित होण्याची वेळ येते. एसटी बस नसल्याने जे सधन आहेत ते ऑटो रिक्षा ने प्रवास करू शकतात, परंतु ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांना एसटी शिवाय पर्याय नाही. करीत एसटी बस सुरू करण्याची मागणी येथील प्रदीप बांदूरकर यांनी केली आहे.

एकेकाळी राजूर ला एसटी बस च्या ६-७ फेऱ्या व्हायचा. नंतरच्या काळात ऑटोरिक्षा सुरू झाल्याने एसटी महामंडळाने येथील एसटी बसफेरी बंद केली. अनेकदा अनेकांनी बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्याकाळात वणी शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने एसटीची कमतरता जाणवली नाही. परंतु आता चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचे किंवा उच्च शिक्षण घायचे म्हटले की शहरात जावेच लागेल. आलेले युग स्पर्धेचे असल्याने व स्पर्धेत टिकवायचे असेल तर शहरात जाऊन चांगल्या शाळेत शिक्षण घेणे, वाचनालयाच्या वापर करणे, वेगवेगळे क्लास करणे हे अगत्याने आलेच. यासाठी ज्यांची आर्थिक सुबत्ता आहे ते ऑटोरिक्षानेच नाही तर स्वतःच्या वाहनाने ही आवागमन करू शकतात, परंतु शिक्षण घेणेच ज्यांच्यासाठी मोठे धैर्याचे काम आहे, त्यांना एसटी बस व त्याला जोडून त्याबसचे कमी दरात मिळणारे पास ह्या शिवाय गत्यंतर उरत नाही. 

मागील दीड वर्षांपासून लॉकडाऊन मुळे शाळा बंद होत्या. आता शासनाने शाळा उघडल्या ने विद्यार्थी व पालकांचा कल हा पाल्यांना शिक्षण देण्याकडे आहे. परंतु राजूर, राजूर ईजारा, बोदाड व भांदेवाडा येथील गरीब विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घ्यायला जाणे एसटी बस शिवाय पर्याय नाही. या करिता येथील प्रदीप बांदूरकर यांनी एसटी महामंडळाचे आगार प्रमुखांना निवेदन देऊन एसटी बस सुरू करण्याची मागणी केली आहे, एसटी बस सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रतिलिपी आमदार बोदकुरवार यांनाही दिली आहे.
Previous Post Next Post