सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२६ ऑक्टो.) : तालुक्यातील मोहदी येथील बौद्ध विहारात संविधान समारोहा सोबत सत्कार समारंभ करण्यात आला.
भारतीय संविधानाची जनतेला माहिती व्हावी या हेतूने प्रजापती महिला मंडळ मोहदी, पंचशील नवयुवक मंडळ मोहदी च्या वतीने बुध्द विहारात संविधान समारोहा सोबतच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे, सत्कार मुर्ती म्हणून अॅड आप्पाराव मैंद होते.
प्रमुख अतिथी महेन्द्र कावळे, प्रकाश गायकवाड, मिलींद मानकर, वर्षाताई नाना भवरे, दादारावजी जाधव, तातेरावजी मानकर, टि. वी कांनदे, गोवर्धन मोहिते, पुंडलिक भगत, कृष्णाजी मुनेश्वर, सागर दादा पाईकराव, अंकुश कावळे इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन व धुप पुजन प्रथम विजयरावजी खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भिमराव भवरे यांनी भारतीय संविधान प्रार्थना व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली.
या वेळी गोवर्धन मोहिते, महेंद्र कावळे, तातेराव मानकर, विजयराव खडसे, प्रकाश गायकवाड इ. अनेक मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मिलींद भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता मोहदी येथील प्रजापती महिला मंडळ, पंचशील नवयुवक मंडळ व गावातील जेष्ठ मंडळी यांनी अथक परीश्रम घेतले.
मोहदी येथे बौध्द विहारात संविधान वाचन समारोह व सत्कार समारंभ संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 26, 2021
Rating:
