चंद्रपूरात आशा वर्करांचे मनपा कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२६ ऑक्टो.) : जगभर पसरलेल्या महाभयानक काेराेनाची झळ चंद्रपूर जिल्ह्यालाही पाेहचली याच कालावधीत स्वताच्या कुटूंबाची व आपल्या जिवाची पर्वा न करता इमाने इकबारे चंद्रपूर मनपा स्तरांवर काम करणा-या अनेक आशा वर्करांनी वारंवार मागणी करुन सुध्दा माहे जानेवारी पासूनचा थकीत चार हजार रुपये प्रोत्साहन भत्ता न दिल्यामुळे आज मंगळवार दि.२६ ऑक्टाेंबरला शहरातील गांधी चाैकात असलेल्या मनपा कार्यालया समाेर आयटकच्या माध्यमांतुन ठिय्या आंदोलन पुकारले आहे.

ऐन दिवाळीच्या ताेंडावर मनपा प्रशासन प्रामाणिक पणे मानधन तत्वावर कामे करणां-या आशा वर्करांना प्रोत्साहन भत्ता देत नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया या आंदाेलनाच्या निमित्ताने अनेकांनी आज व्यक्त केल्या आहे. जन जाग्रूती करणे, आराेग्याची काळजी घेणे, महाआयुष सर्वे करणे, काेविड-१९शी निगडीत अशी अनेक महत्वांची कामे त्यांनी दिवस रात्र पार पाडली आहे. मध्यंतरी ठिय्या आंदोलन झाले असता मनपाने प्रोत्साहन भत्ता देण्यांचे मान्य केले हाेते परंतु आता हेच मनपा प्रशासन प्रोत्साहन भत्ता देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आराेप आयटकने केला आहे.
जाे पर्यंत प्रोत्साहन भत्त्यासह इत्तर मागण्या मनपा प्रशासन मंजूर करीत नाही ताे पर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच सुरु राहील असा कडक इशारा आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झाेडगे, सविता गटलेवार, प्रतिमा कायरकर, मिनाक्षी ढाेमने, भावना वनकर, मिना जुमडे, साेनाली गेडाम, किरण करमरकर, मंजुषा रामटेके, सुलभा भजभुजे, मोनिका सुर्वेसह अनेक आशा वर्करांनी दिला आहे. 
चंद्रपूरात आशा वर्करांचे मनपा कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन चंद्रपूरात आशा वर्करांचे मनपा कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.