सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (२६ ऑक्टो.) : भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला असल्याची घटना २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान, कासारबेहळ गावालगत घडली.
महागाव तालुक्यातील वाकान येथील आकाश साहेबराव राठोड (२२), सचिन आडे (१९) हे दोघे आपल्या दुचाकी क्र.एम एच १२ बी क्यु ६८९४ या क्रमांकाच्या दुचाकी ने हिवरा मार्गे टेंभीकडे ऊस तोडण्याच्या कामासाठी निघाले असतांना कासारबेहळ गावानजीक त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटुन समोरून येणाऱ्या डिस्कव्हर दुचाकी क्र.एम एच २९ एपी ४५४० ला बेधडक जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चकणाचूर झाला असुन, घटनास्थळी रक्त बंबाड वातावरण होते.
या भीषण अपघातात आकाश राठोड, दत्ता बिरंगणे (४५) रा.कासारबेहळ व पांडुरंग सुभाष ढोणे (२५) रा. कुंभारी ता.पुसद हे गंभीर जखमी झाले आहेत तर, सचिन आडे रा. वाकान हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती असुन, कासारबेहळ येथील पोलीस पाटील रामेश्वर राठोड यां विठ्ठल करे यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने अपघातात झालेल्या जखमींना माहुर येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने अपघातग्रसताना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले. परंतु आकाश राठोड व दत्ता बिरंगणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारास नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
दुचाकीची आमने -सामने धडक, ३ गंभीर जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 26, 2021
Rating:
