वांजरी विहीर प्रकरणाची कार्यवाही निश्चित,गटविकास अधिकारी कार्यवाहीच्या प्रतिक्षेत..


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२० ऑक्टो.) : वांजरी गटग्रामपंचायत येथे रोजगार हमी अंतर्गत सन २०१८-२०१९ रोजी विहीर दुरुस्तीकरणासाठी मंजुर झाली. परंतु मंजूर झालेल्या रक्कमेची परस्पर उचल करण्यात आली आणि दुरुस्तीकरण कोणत्याही प्रकारचे करण्यात आले नाही.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) जिल्हा परिषद यवतमाळ नरेगा यांच्या आदेशाने संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मिळाले. गटविकास अधिकारी यांनी कामाची चौकशी करण्यासाठी ग्रामसेवकांना मोजपुस्तिका व फाईल्सची मागणी केली. परंतु ग्रामसेवकांना कामाविषयी दस्तऐवज ग्रामपंचायत कार्यलयात रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे. असे उत्तर मिळत आहे. यावर गटविकास अधिकारी उचित कार्यवाही करेल. मनरेगा जॉबकार्ड धारक काम न करता थेट ठेकेदारांनी विहिरीचे काम दाखवून मजुरांच्या थेट अकाउंट मध्ये पैसे टाकून संबंधित व्यक्तीला उचलून दिल्याचे विधान मजूर (जॉबकर्ड) धारक आपल्या बयानीतुन व्यक्त करत आहे.
                   
रोजगार हमी योजना ही बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे. बेरोजगार आधार देण्याचे काम रोजगार हमी करत आहे. याकरिता प्रशासन दिवसरात्र जनतेच्या कल्याणासाठी आपला देह झिजवत आहे. परंतु या रोजगार हमी चा फायदा भ्रष्ट ठेकेदार घेतांना दिसत आहे.
                 
कामाची संपूर्ण माहिती मिळताच संबधित व्यक्तीचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल. आणि लवकरात लवकर अधिकाऱ्यांवर व भ्रष्ट ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.
वांजरी विहीर प्रकरणाची कार्यवाही निश्चित,गटविकास अधिकारी कार्यवाहीच्या प्रतिक्षेत.. वांजरी विहीर प्रकरणाची कार्यवाही निश्चित,गटविकास अधिकारी कार्यवाहीच्या प्रतिक्षेत.. Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.