सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२० ऑक्टो.) : आज पांढरकवडा पोलिस स्टेशन येथे तालुका विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि पोलिस स्टेशन कार्यालयांचे संयुक्त विद्यमाने महिलांचे कायदे विषयक जनजागृती करण्यात आले. प्रमुख पाहुणे जगदिश मंडलवार (पो. नि.) यांनी मनोधैर्य योजना बाबतीत पिडीतांना अनेक लाभ मिळत असल्याने सांगितले. ॲड शितल गुंडावार यांनी ऍसिडचा हल्ला व त्या पासुन संरक्षण विषयक माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बुद्रुक साहेब (न्यायाधीश दिवाणी न्यायालय केळापूर), यांनी ३७६ व एफआयआर मध्ये प्रथम पुरावा नोंद महत्वाची असुन त्यावरच केस अवलंबून असते असे सांगितले. तसेच महिलांचे संरक्षण विषयक माहिती दिली.
या कार्यक्रमात उपस्थित ॲड गजानन खैरकर, विजय महाले, निलेश गायकवाड, अंजली कानबले मॅडम, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेटेवार यांनी केले तर आभार निलेश गायकवाड यांनी केले.
पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे महिलांचे कायदे विषयक शिबिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 20, 2021
Rating:
