सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
झरी, (२० ऑक्टो.) : पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून एका विवाहित महिलेवर शेजाऱ्यानेच अतिप्रसंग केल्याची घटना मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्धवन या गावात १४ ऑक्टोबरला रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. पीडित महिलेने याबाबत १९ ऑक्टोबरला मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्धवन या गावात पतीसह रहात असलेल्या एका विवाहित महिलेवर शेजाऱ्याची वाईट नजर होती. तो घराच्या छतावर उभा राहून नेहमी या महिलेला न्याहाळायचा. ११ ऑक्टोबरला महिला लघुशंकेकरिता बाथरूम मध्ये गेली असता घराच्या छतावर उभा असलेल्या आरोपीने तिला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्याचे हे अश्लील दर्शक कृत्य तिने आपल्या पतीला सांगितले. त्यावेळी पतीने आरोपीच्या घरी जाऊन त्याला जाब विचारात समाज दिला होता. परंतु नजरेत वासना दाटलेला आरोपी समज देऊनही थांबला नाही. वासनेने पछाडलेल्या या आरोपीने १४ ऑक्टोबरची संधी साधली. महिलेचा पती त्याच्या मालवाहू वाहनाला भाडे मिळाल्याने बाहेरगावी गेला होता. अशातच महिला ही देवी पाहण्याकरिता घराबाहेर पडली. ती रात्री ११ वाजता घरी परतली असता घराच्या छतावर घिरट्या मारत असलेल्या आरोपीने ती दिसताच भिंतीवरून उडी घेत तिच्या घरात प्रवेश केला, व तिला जबरदस्ती बाथरूम मध्ये ओढत नेत तिचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग केला. घडलेल्या प्रकाराने महिला मानसिक दडपणात आली. नराधमाच्या विकृत प्रवृत्तीची ती बळी ठरली. अब्रूची लक्तरं काढणाऱ्या त्या नराधमाविरुद्ध अखेर तिने १९ ऑक्टोबरला रात्री २०.५१ वाजता मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत तत्काळ आरोपीला अटक केली. मुकुटबन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आरोपी सतीश दत्तू म्याकलवार (३५) रा. अर्धवन ता. झरी याला गजाआड केले. तसेच महिला अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे आरोपीवर भादंवि च्या कलम ३७६, ३५४(D)(i), ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, संतोष कायवेलवार, विजय वानखेडे, रवि इसनकर करित आहे.
घरी एकटी असलेल्या महिलेवर शेजाऱ्याने केली बळजबरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 20, 2021
Rating:
