शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागुन कोमवाड यांचे लाखांचे नुकसान


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२० ऑक्टो.) : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागुन घरातील कापुस व ईतर गृहोपयोगी साहित्य जळल्याने दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी रात्री वरोडी येथे घडली.

महागाव तालुक्यातील वरोडी येथील जांबुवंतराव कोमवाड यांच्या घरात शॉर्ट सर्किट होवुन आग लागल्याने घरातील कापुस, सोयाबीन, गहु, ज्वारी, पलंग, फ्रिज जळुन खाक झाल्याने कोमवाड यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

उपतालुका प्रमुख राजु भाऊ धोतरकर यांनी वरोडी येथे जाऊन कोमावाड कुटुंबांना भेट दिली व नेमकी आग कशामुळे लागली याबाबत चर्चा केली. मात्र आचे अद्याप कारण कळाले नाही, रात्रीच तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याचे समजते व लवकरच खासदार हेमंत पाटील यांना या संदर्भात माहिती कळवण्यात असून नुकसान ग्रस्त कुटुंबाला शासनाची मदत मिळवून देण्यात येईल आसे राजु भाऊ धोतरकर यांनी सांगितले. दिवाळी सारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय अन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालांचे भाव पडल्याने शेतकरी आणखीच अडचणीत आला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागुन कोमवाड यांचे लाखांचे नुकसान शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागुन कोमवाड यांचे लाखांचे नुकसान Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.