सुधाकर पुराणिक यांचा भावोत्कट सत्कार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (९ ऑक्टो.) : जैताई देवस्थानचे ज्येष्ठ संचालक सुधाकर पुराणिक यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवे बद्दल व मंदिराला त्यांनी दिलेल्या उदार देणगी बद्दल मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

वणी येथे अर्ध शतकापेक्षा अधिक सेवा दिलेले पुराणिक सर आता यवतमाळ येथे स्थायिक झाले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीर्घकाळा नंतर आलेले सर वणीतील आठवणींनी भावविभोर झाले होते..आरतीच्या वेळेस त्यांनी ढोलकी वाजवली व आल्या बरोबर देवी समोर दोन पदे सादर केली.
        
सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी त्रुप्ती उंबरकर,नामदेव पारखी,प्रशांत महाजन,मुलचंद जोशी, किशोर साठे, राजा जयस्वाल आणि अन्य बंधु भगिनींची उपस्थिति होती.
सुधाकर पुराणिक यांचा भावोत्कट सत्कार सुधाकर पुराणिक यांचा भावोत्कट सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.