Top News

घुग्घुस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन - ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (९ ऑक्टो.) : आई जिजाऊ अ हेल्पिंग हॅण्ड ऑर्गनायझेशनचे संस्थापक क्रिष्णा पाईकराव यांचा नेतृत्वाखाली उपरोक्त संस्थेच्या वतीने आज शनिवार दि. 9 ऑक्टोंबरला प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्षिया जूही, कोल्हे, व समाज सेवक संजय गाविड उपस्थित होते. आयोजित आजच्या या रक्तदान शिबीरात युवा पिढीने स्वयंस्फुर्तिने आपला सहभाग नाेंदविला हाेता.

सामाजिक बांधिलकीच्या नात्यातुन या रक्तदान शिबिरात एकुन पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले अमूल्य सहकार्य संस्थेला दिले. गरजु लोकांना जी कोणती मदत लागेल ते या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल शिवाय मुलींना शिक्षणाची व कराटे स्कुलची सोय उपलब्ध करुन देण्यांत येईल असे मनाेगत नागेश पाईकराव यांनी व्यक्त केले. नगर परिषद घुग्घुसच्या मुख्याधिकारी अर्षिया जुही यांनी देखील संस्थेला शुभेच्छा देत त्यांनी आपले विचार या वेळी मांडले.

कार्यक्रमाचे संचालन ईश्वर बेले तर आभार प्रदर्शन रोहित मोकरतीवार यांनी केले. या रक्तदान शिबीरात प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष नागेश पाईकराव उपाध्यक्ष ललित गाताडे, सहसचिव प्रीतम ठेंगणे, कोषाध्यक्ष रोहित मोकरतीवार पदाधिकारी व सर्व सदस्यगण उपस्थित होते.
Previous Post Next Post