सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (४ ऑक्टो.) : शहरालगत असलेल्या नवीन वागदरा गावातील अल्पवयीन मुलगी ३ जुलैला अचानक घरून बेपत्ता झाली. मजूर कुटुंबातील ही मुलगी रात्री अचानक घरून निघून गेली. पहाटे ४.३० वाजता वडिलांचा अचानक डोळा उघडला असता त्यांना झोपलेल्या ठिकाणी मुलगी आढळली नाही. त्यांनी लगेच आपल्या पत्नीला झोपेतून उठवत मुलगी दिसत नसल्याचे सांगितले. दोघांनीही तिचा सगळीकडे शोध घेतला. पण ती कुठेही आढळून न आल्याने अखेर आई वडिलांनी पोलिस स्टेशनला येऊन मुलगी घरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशयही मुलीच्या आईने तक्रारीतून व्यक्त केला होता. तब्बल तीन महिन्यानंतर त्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ती बेपत्ता झालेली मुलगी शहरातील दामले फैल येथे एका घरी नांदत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची त्या घरातून सुटका केली असून तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे. तिला पळवून नेणारा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. नवीन वागदरा येथील अल्पवयीन मुलगी ३ जुलैला घरून अचानक बेपत्ता झाली. रात्री कुटुंबासोबत झोपलेली ही मुलगी रात्री दरम्यान घरून निघून गेली. तिला दामले फैल येथील मल्लेश नीलकुंटावार याने पळवून नेल्याचे आता उघडकीस आले आहे. तब्बल तीन महिन्यानंतर या मुलीचा शोध लागला आहे. मुखबिरांनी दिलेल्या माहिती वरुन पोलिसांना पळवून नेलेल्या या मुलीचा शोध लावण्यात यश आले आहे. पोलिसांनी मुलीची आरोपीच्या घरातून सुटका केली असून तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे. मल्लेश हा मात्र फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी याआधी लावलेल्या कलमामध्ये वाढ करून आरोपीवर भादंवि च्या कलम ३७६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे व संदिप एकाडे करीत आहे.
घरून पळून जाणाऱ्या वा एखाद्याने फूस लावून पळवून नेणाऱ्या अल्पवयीन मुली साधरणतः गरीब मजूर घरच्या असतात. आई राबराब राबणारी, वडिलांच्या कामाच्या नावाने बोंबा. नुसतं दारू ढोकसायचं, नशेत तर्रर्र होऊन राहायचं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचीही काळजी नाही. वयात येणाऱ्या मुलींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण कारण्याकरिताही पैसा नाही. आई वडील नुसतेच नावाचे. वडील दारू पिऊन वाद घालतात. तर आई त्यांना तोंड देण्यात मग्न असते. आई वडिलांच्या भांडण तंट्यात मुले भरडली जातात. कामे करून कुटुंबाला हातभार लावण्याऐवजी वडिल दारू हातात घेऊन पाय पसरून राहतात. मग मुली आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता कुणाकडे हात पसरणार. अशातच त्यांना कुणी जवळीक दाखविणारा व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करणारा मिळाला की, त्या त्याच्याकडे ओढल्या जातात. अशा मुलींना फूस लावून पळवून नेणं कुणासाठीही अवघड नसतं. आई वडिल मुलींना सांभाळण्यात, माया लावण्यात किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात कमी पडत असतील तर त्यांना कुणीही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून, आपुलकी दाखवून, पळवून नेऊ शकतं. त्यामुळे पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलींची वेळोवेळी विचारपूस करून आवश्यक ती काळजी घेणे जरुरी असते.
वागदरा येथील राहत्या घरून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी तब्बल तीन महिन्यानंतर सापडली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2021
Rating:
