सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (४ ऑक्टो.) : शनिवार दि. 2 आक्टोंबरला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त गडचिराेलीत एक कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. त्या निमित्ताने सर्वधर्म समभाव प्रार्थना झाली. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई व आदिवासी समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते. उपराेक्त कार्यक्रमास डॉ. शिवनाथ कुंभारे समाजसेवक तथा अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली, रोहिदास राऊत जेष्ठ पत्रकार द हितवाद, प्रकाश भाऊ अर्जुनवार, विलासराव निंबोरकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथा सर्व धर्मांचे कार्यकर्ते, व मान्यवर मंडळी उपस्थित होती. देशातील वर्तमान परिस्थिती पाहता विविध संघटनांनी मिळुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे होते. देशातील नागरिकांमध्ये या महापुरुषांचे विचार पोहचले पाहिजेत व रुजले जावे असे मत अनेकांनी या वेळी व्यक्त केले.
गडचिराेलीत गांधी जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2021
Rating:
