पदावर नसतांना सुद्धा पद लावून केले जिल्हापरिषद कामाच्या उदघाटन जाहिरात आता कार्यवाही होणार का?

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (४ ऑक्टो.) : मोहदा येथील सरपंच व उपसरपंच पद हे 14 जुलै 2021 ला बरखास्त झाले आहे त्यानंतर प्रशाशक यांनी कारभार सांभाळला त्या मुळे सर्व सामान्य नागरिक सुद्धा प्रशाशक यांना भेटून आपली छोटी मोठी तक्रार करून आपल्या समस्या निपटवण्याचा प्रयन्त करत आहे. प्रशाशक हा शासकीय कर्मचारी असल्याने त्यांना बिना अडथळा किंवा परसेन्ट ठेऊन काम करत नसल्याने गावातील कामे होत असतांना माजी उपसरपंच आपणच कामे करत आहो असा आव आणून प्रशासकाने केलेले काम जसे काही तेच करत आहे असे, प्रयत्न करत आहे.

इतकी वर्षे सत्ता भोगून सुद्धा पद सोडण्याचा मोह सध्या नेत्याला होत नाही आहे, प्रशासक बसल्यावर इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेली घरकुल यादी जाहीर झाली. यात ही आपले माजी नेते श्रेय घेण्याचा मोह सोडत नाही आहे. ग्रामपंचायत कायद्याअंतर्गत प्रशासक असतांना बरखास्त उपसरपंच शासकीय कामात येऊ शकत नसतांना आपण कसे श्रेय घायचे यांची पूर्ण तयारीच करून आहे. परंतु मोहदा गावातील नागरिक जागृत झाले असून, गेल्या 15 वर्षाचा हिशोब या वेळी नेत्या कडून घेतलीच. कारण गाव आहे तिथेच आहे आणि नेते आपले घर भरण्यात व्यस्थ आहे तरी, शासनाने सादर ही बाब लक्षात घेऊन उचीत कार्यवाही करून बरखास्त उपसरपंच यांना जाब विचारावा व ग्रामपंचायत कायदा तोडल्या प्रकरणी त्यांना निवडणूक बंदी घालावी अशी, मागणी तृषाल गब्रानी यांनी केली आहे.
पदावर नसतांना सुद्धा पद लावून केले जिल्हापरिषद कामाच्या उदघाटन जाहिरात आता कार्यवाही होणार का? पदावर नसतांना सुद्धा पद लावून केले जिल्हापरिषद कामाच्या उदघाटन जाहिरात आता कार्यवाही होणार का? Reviewed by सह्याद्री चौफेर on October 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.