कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देणे सुरु
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (४ ऑक्टो.) : विज्ञान शाखेला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे. विज्ञान शाखेत करियर बनवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ११ वी मध्ये प्रवेश मिळण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. मारेगाव येथील महाविद्यालयाला विज्ञान शाखेची मान्यता मिळाली आहे. सर्व सोई सुविधांनी सज्ज असलेल्या या महाविद्यालयाला दीर्घ प्रतीक्षेनंतर विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश न मिळाल्याने नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांकरिता ११ वी प्रवेशाची ही उत्तम संधी आहे. शेतकरी शिक्षण संस्था द्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मारेगांव येथे ५ ऑक्टोबर पासून ११ वी विज्ञान शाखे करिता प्रवेश देणे सुरु होणार आहे. मारेगांव तालुक्यात १० वी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पर्याप्त महाविद्यालये नसल्याने येथील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्याकरिता इतर तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत असे. परंतु आता मारेगाव येथीलच कला वाणिज्य महाविद्यालयाला विज्ञान शाखेची मान्यता मिळाली असल्याने विज्ञान शाखेत करियर बनवू पाहणाऱ्या येथील विद्यार्थ्यांकरिता ही एक मोठी उपलब्धी आहे. राज्य महामार्गाला लागून असलेली प्रशस्त दुमजली इमारत, मोठे क्रीडांगण व निसर्गरम्य परिसर, अनुभवी प्राध्यापक, भव्य ग्रंथालय, विद्यापीठाने मान्यता दिलेली रिसर्च प्रयोग शाळा ही या महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाला विज्ञान शाखेची मान्यता मिळावी याकरिता प्राचार्य हेमंत चौधरी यांनी शासन प्रशासनाकडे हा विषय लावून धरला. विज्ञान शाखेची मान्यता मिळावी म्हणून सतत पाठपुरावा केला. त्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून तब्बल ३६ वर्षानंतर मारेगाव येथील कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाला विज्ञान शाखेची मान्यता मिळाली आहे. उद्यापासून या विद्यालयात ११ विज्ञान शाखेकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. विज्ञान शाखेत भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेशाची ही सुवर्ण संधी आहे.प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
~ 9403146315
~ 9284444279
कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देणे सुरु
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2021
Rating:
