कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देणे सुरु
सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (३ ऑक्टो.) : शेतकरी शिक्षण संस्था द्वारा संचालीत कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मारेगाव (रोड) येथे नुकतेच वर्ग 11 वी विज्ञान (स्वयं अर्थ) करिता प्रवेश देणे सुरु आहे. 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशाची ही सुवर्ण संधी! सन 2021-22 करिता आहे. प्राचार्य डॉ. अविनाश घरडे व प्राचार्य हेमंत चौधरी यांच्या अथक प्रयत्नानंतर 36 वर्षानंतर मारेगांवच्या कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाला विज्ञान शाखा मिळाली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रापासून वंचित असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना ही आनंदाची बाब आहे.आता पाल्यांना ज्यादा फीस भरून वा शहराबाहेर जाऊन प्रवेश घेण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे.
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये :
• अनुभवी व तज्ञ् प्राध्यापक
• महाविद्यालयाची यवतमाळ रोड ला प्रशस्त दुमजली इमारत
• संस्थेला कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय नॅक बी + तसेच आयएसओ दर्जाप्राप्त मिळालेली एकमेव महाविद्यालय
• विद्यापीठाने मान्यता दिलेल्या रिसर्च प्रयोगशाळा.
• भव्य ग्रंथालय.
• आधुनिक तंत्रज्ञाचा उपयोग करून ज्ञानार्जन.
• प्रशस्त क्रिडांगण, निसर्गरम्य परिसर.
आणि विशेष पार्किंग व्यवस्था. अशी नावीन्यपूर्ण असलेली एकमेव शाखा असल्याने परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा असे आवाहन प्राचार्य हेमंत चौधरी यांनी केले आहे.
कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश देणे सुरु
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2021
Rating:
