सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (३० ऑक्टो.) : माथार्जून येथील दारू च्या दुकानातून चढ्या दरात पव्वा विकला जात आहे. त्यामुळे तळीराम संतापले असून ओरडा ओरड करीत आहे.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या माथार्जून येथील देशी दारूचे दुकान सुरु आहे. मधील काळात पाच वर्षे बंद होती, आता गेली तीन वर्ष झाली पुन्हा सुरु झाली असून या कठीण काळात परवाना धारक हा ज्यादा दाराने दारू विकत आहे. असे परिसरातील तळीरामांची तक्रार आहे.
विशेष उल्लेखनीय कि, अहो रात्र घरून दारू विकल्या जात असून ठरलेल्या वेळेवर दुकान सुरु न करता सकाळीच आठ वाजता दुकान सुरु होत असून देशी दारूच्या किंमतीत ही वाढ करून विकल्या जात आहे. प्रत्येक पव्यावर 10/20 रुपयाने चढ्या भावात विकल्या असून ही सर्व सामान्य जनतेची लूट होत असल्याचे बोंबाबोंब होत आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे ही दूर लक्ष होत असून या देशी दारू दुकानात बे हिसाब पैसे मोजावे लागत आहे. 60 रुपयांचा पव्वा 70 ते 80 रुपयाला तळीरामांना पव्वा विकल्या जात आहे. कामामुळं सीनभागाडा (थकवा) येतोय त्यामुळे दारू पितो, किंबहुना दारूची या अनेकांना लतही लागली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आणि चा आहे. परंतु हा परवाना धारक काही च्या काही दरात दारू विकली जात आहे. अशी तळीरामात ओरड आहे. परिणामी सणासुदीच्या पर्वावर उत्पादन शुल्क विभागाने अशा बे हिसाबी विकणाऱ्या धारकांवर नियंत्रण ठेवावे व तळीरामांना प्रिंटेट किंमतीनुसार विक्री करण्याचे सक्त आदेश देण्यात यावे. अशी मागणी तळीरामातून होत आहे.
पव्वा! चढ्या दरात विकतो "येथील" परवाना धारक, उत्पादन शुल्क विभागाचे होत आहे दुर्लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 30, 2021
Rating:
