सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : काल शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "वार्ड तिथे राष्ट्रवादी "या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सुचनेच्या अनुषंगाने तथा बल्लारशहा विधान सभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात मूल नगरीत एक बैठक घेण्यात आली.
सदरहु बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १४ येथे पार पडली.बैठकीत अनेक युवा कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. दरम्यान या वार्डातील अनेक युवकांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.
पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची नविन वार्ड कार्यकारणी करण्यात आली.
आयाेजित बैठकीत विशाल श्रीकोंडावार, आशिष रामटेके, अमोल वाकडे, विनोद गुरनुले ,अंकित वन्नकवार, प्रदीप देशमुख, प्रकाश बावणे, प्रीतम भडके, जुगल भडके, दादू भडके, अमोल वाढई, गोलू ढोले, नयन भोयर, गणेश भोयर, कमलेश भोयर , तुषार शेंडे, विनोद गुरनुले, प्रणय घोगरे, नंदलाल भडके, कृष्णा वाढई, संदीप वाढई, थामदेव रामटेके, रसिक वाडगुरे, राजेश्वर मोहूर्ले, अमित गिरडकर, दीपक महाडोळे, नंदकिशोर शेंडे गणेश शेंडे, सुजल शेंडे राजू भोयर, अतुल मडावी , सुरज शेंडे,शंकर क्षीरसागर, गणेश गिरडकर, धनराज गिरडकर, जोगेश गिरडकर, राकेश कन्नाके ,कार्तिक शेंडे,सुमीत वासेकर,प्रवीण मडावी,अमोल वाढई, गुलशन रामटेके,सतीश गुरनुले,राजेश्वर मोहूर्ले, राजू बोळे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
आगामी नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी या बैठकीत दिली.
मूल शहरात अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 30, 2021
Rating:
