सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०२ सप्टें.) : सामाजिक कुटुंब अर्थ सहाय्य याेजने अंतर्गत गाैरी गणेश जेंगठे या विधवा महिलेने विहीत नमुन्यात अर्ज मूल तहसील कार्यालयात सादर केला हाेता. परंतु कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तिचा अर्ज मंजूर हाेत नव्हता. शेवटी गाैरीने थेट मूल महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षा अर्चना मार्कंडी चावरे यांची भेट घेतली व या प्रकरणाची माहिती त्यांना सांगितली. चावरे यांनी पूर्ण प्रकरण तपासून त्यातील त्रूट्यांची पुर्तता केली. शेवटी सभेपुढे गाैरीचे अर्थ सहाय्य याेजनेचे प्रकरण मंजूर झाले.
दि.१ सप्टेंबरला अर्चना चावरे, मूल शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा जयश्री झरकर, महिला वार्ड अध्यक्षा चंदा कारेकर, वार्ड सदस्य बेबी बावनथडे, ताराबाई जेंगठे, कल्पना मेश्राम, रंजना ठाकरे, ज्योत्सना भाेयर, मंदा मडावी, शारदा ठाकरे, शाेभा शेंडे यांनी गाैरी जेंगठे यांचे निवासस्थानी जावून तिला विस हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.विशेष म्हणजे अर्चना चावरे ह्या संजय गांधी निराधार याेजना मूलच्या सदस्या आहे. त्यांनी अशा प्रकारची अनेक प्रलंबित प्रकरणे यापूर्वी निकाली काढलेली आहे.
विधवा महिलेला मदत मिळून देण्यास मूलच्या अर्चना चावरेंनी केला पाठ पुरावा!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2021
Rating:
