बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करत वानोळा येथे तिज विसर्जन


सह्याद्री न्यूज | वासुदेव राठोड 
माहूर, (०२ सप्टें.) : बंजारा समाजातील अविवाहित युवतींसाठी अत्यंत महत्वाचा असलेला तीज उत्सव वानोळा येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त बंजारा समाजातील संस्कृतिचे दर्शन घडून आले. वानोळा येथे २३ आॕगस्ट रोजी तिज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात तांडयाचे नायक, कारभारी, डावो व महिला यांच्या मार्गदर्शनात तांडयातील युवती सलग दहा दिवसापासून पेरल्या गेलेल्या तिज चे संगोपन व पूजन करत दि.१ सप्टे. रोजी मोठया थाटात व नाचत पारंपारिक गित गायन करत तिज विसर्जन करण्यात आले.

या प्रसंगी नायक-विजय राठोड, कारभारी-कृष्णकुमार राठोड, हेमसिंग चव्हाण, संतराम राठोड, शंकर आडे, सुरेश राठोड, तारासिंग चव्हाण, अशोक राठोड, गोविंद चव्हाण, प्रा.वाय.एच.जाधव सर, मधूकर राठोड, चंदु चव्हाण, फुलसींग राठोड, एन. एस.राठोड, वसंत चव्हाण, वल्लभ पवार, संजय चव्हाण गजानन चव्हाण, अभिजित राठोड उल्लाश राठोड, शंकर चव्हाण, संतोश राठोड, वासुदेव राठोड या सर्वांच्या हस्ते पुजेचा कार्यक्रम पार पडला. नायक, कारभारी च्या घरापासून गावात तीज विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत महिला व युवतीनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा संस्कृतिचे दर्शन घडविणारे नृत्य सादर केले. नजीकच्या गाव तलावात युवतींनी तीज विसर्जीत केली. 

दहा दिवसापासून सुरू असलेल्या तिज उत्सव घडवुन आणण्यासाठी बळीराम राठोड, आनंदराव राठोड, सुनिल चव्हाण,बंडू पवार,पंचीबाई पवार आदीनी अथक परिक्षम केले.
बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करत वानोळा येथे तिज विसर्जन बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करत वानोळा येथे तिज विसर्जन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.