सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (०२ सप्टें.) : तालुक्यातील मुडाणा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारामुळे गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रात्री घडली असल्याचे कळतेय.
रमेश शिवाजी शिंदे (४८) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, त्यांच्यावर असलेल्या बॅकेचे कर्ज, शेतातील नापीकी व दोन मुलीचे लग्न केल्यामुळे झालेली कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानी रात्री आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली.
घटनेची माहीती कळताच त्याचा भाऊ दिलीप शिंदे गेला व पोलिस पाटलांच्या समवेत पो.स्टे. मध्ये तक्रार दाखल केली असता पंचनाम्याकरीता जमदार शरद येडतकर यांनी येवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता सवना येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्यावर मुडाणा येथील स्मशान भूमीत १:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली लग्न झालेल्या, व लहान दोन मुले असा आप्तपरिवार असून त्यांच्या घरातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्याने त्या लहान मुलाच्या डोक्यावरील वडीलाच छत्र हरवल आहे.
मुडाणा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2021
Rating:
