सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (०२ सप्टें.) : जि. प. गुंज सर्कल सदस्या वर्षाताई भवरे यांच्या फंडातून विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा ३१ आँगस्ट रोजी पार पडला. निवडणूक लढवित असतांना जनतेला अनेक कामाचे आश्वासने दयावे लागतात.
निवडून आल्यानंतर मात्र, दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करतांना, फंड खेचून आणतांना किती तारेवरची कसरत करावी लागते ते निर्वाचित पदाधिकार्यांनाच माहीत. परंतू अशाही परिस्थितीत कोरोनाच्या आर्थिक टंचाईच्या काळात जि.प. चा फंड आणून प्रामाणिकतेने आश्वासनांची पुर्तता करणार्या जि.प. सदस्या वर्षाताई नानासाहेब भवरे ह्या एकमेव समाजसेविका ठरल्या आहेत.
ग्राम गुंज येथे जनसुविधा फंडातुन कब्रस्तान ईदगाह, शिक्षण विभाग फंडातून ४ अंगणवाडी ईमारत व तसेच दलित वस्ती फंडातुन २ सिमेंट काँक्रिट रस्ते ईत्यादी आवश्यकता पुर्ण कामांचे वर्षाताई भवरे (जि.प.सदस्या) यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.
याप्रसंगी गुंज सर्कल सदस्या वर्षाताई भवरे यांचे गावकर्यांनी आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी पं. स. सभापती अनिता चव्हाण, माजी सभापती गजानन कांबळे, पुष्पा कांबळे गुंज ग्रामपंचायत संरपच, श्याम गंगाळे, गुंज ग्रामपंचायत उपसंरपच, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब भवरे व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गुंज येथे विविध विकास कामाचे लोकार्पण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2021
Rating:
