सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (१७ सप्टें.) : वरोरा महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध रेतीसाठ्याचा 21 सप्टेंबरला लिलाव करण्यात येणार असून इच्छुकांना तो बोली लाऊन खरेदी करता येणार आहे. वरोरा तालुक्यातील माढेळी या गावातही 900 ब्रास अवैध रेतीसाठा आढळून आला असून त्या रेतीसाठ्याचाही याच दिवशी लिलाव करण्यात येणार आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना हा अवैध रेतीसाठा आढळून आला आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार माढेळी येथिल हा अवैध रेतीसाठा जप्त करुन शासन जमा करण्यात आला आहे. या रेती साठ्याचाही चंद्रपुर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लिलाव करण्यात येणार असून लिलावात सहभागी होणार्या सभासदांना येथिल रेतीसाठाही बोली लाऊन खरेदी करता येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रेतीची सरासरी किंमत 1100 रुपये प्रती ब्रास ठेवण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय वरोरा येथे दुपारी 12 वाजता रेतीचा लिलाव होणार आहे. कोरोनाचे नियम पाळुन सभासदांनी या लिलावात सहभागी होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. रेतीच्या होणार्या लिलावात बोली लाऊ इच्छीनार्या सभासदांना 10 हजार रुपये अमानत रक्कम तहसिल कार्यालयात जमा करावी लागणार आहे. अमानत रक्कम जमा कर्णार्या व्यक्तींनाच लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. ज्यांची बोली लागणार नाही, त्यांना अमानत रक्कम परत केली जाणार आहे. ज्यांची बोली पुर्ण होईल त्यांना लगेच चालानाद्वारे संपुर्ण रक्कम तहसिल कार्यालयात जमा करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी रेतीसाठा दर्शविला आहे, त्या ठिकाणी रेतीसाठा आहे की, नाही याची लिलावात सहभागी होणार्यालच खात्री करुन घ्यायची आहे.
माढेळी येथे आढळून आलेल्या अवैध रेतीसाठ्याचाही होणार लिलाव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 17, 2021
Rating:
