सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (१७ सप्टें.) : मुदखेड येथे गोल्ला गोलेवार यादव समाज सेवा संघाच्या स्थापना सोहळ्यास समाजाकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मेळाव्यात संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व नांदेड जिल्हाद्यक्ष यांची निवड सर्व गोल्ला गोलेवार समाजाच्या संमतीने करण्यात आली. सुरुवातीला यदुकुल भुषण भगवान श्रीकृष्ण पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष स्थानी चेअरमन मारोतराव बल्लाळकर हे होते.
प्रास्ताविक नगरसेवक संजय आऊलवार यांनी केले. समाजाचे कुनीही ठेकेदार होवु देणार नाही असे जोरदारपणे स्पष्ट करुन नवी संघटना स्थापने मागील भुमिका ही सांगितले. अनुप अनेमवार, अभियंता कमटे, आनंदा आनेमवाड यांनी संघटना कशी कार्य करेल हे सांगितले. डाॅ. मठमवार, माजी अध्यक्ष कडेलवार यांनी ही विचार मांडले सुत्र संचालन गणेश कॅतमवाड यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदी आनंदराव बालाजीराव आनेमवाड व नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी नगरसेवक संजय आऊलवार यांच्या नावाची घोषणा कोअर कमेटी ची संमती घेऊन यावेळी केली. उपस्थित बांधवांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले .अध्यक्षीय भाषणात माजी प्रदेश अध्यक्ष मारोतराव बल्लाळकर यांनी जोरदार हल्ला चढवला. नवीन संघटनेची स्थापना ही गावोगावी समाज बांधवांना संपर्क करून आणि उपस्थित समाज बांधवांनी संमती दिल्यावर गोल्ला यादव समाज सेवा संघाची स्थापना करत आहेत हे जाहिर सांगितले.
मेळाव्याला उपस्थित डाॅ. सायन्ना मठमवार, साईनाथ कडेलवार, न. प. गट नेते अविनाश मैलागीरे, अभियंता संदेश कमटे, उपसभापती आनंदराव गादीलवाड, अध्यक्ष दिगाबर कडलवार, श्रीनिवास मैलागिरे, रावण बाचेवाड, बाबुराव चरकुलवार, संजय चरकुलवार, गोविंद बदेवाड, आंजनीकर, जेजेराव झंपलवाड, बालाजी आईनवाड, नितिन वाडीकर, ज्ञानेश्वर कारलेवाड, योगेश मध्येबैनवाड, उमेश मध्येबैनवाड, मारोती फैलवाड व महाराष्ट्रातील सर्व गोल्ला गोलेवार यादव समाजातील प्रमुख समाज बांधव उपस्थित होते.
गोल्ला यादव समाजसेवा संघाची स्थापना व नवीन प्रदेशाध्यक्ष व जिल्हाद्यक्ष यांची निवड करण्यात आली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 17, 2021
Rating:
