...असा साजरा झाला चंद्रपूरात राष्ट्रीय बेरोजगार दिवस 🟪

🟥
सह्याद्री न्यूज | किरण घाटे🟥
चंद्रपूर, (१८ सप्टें.) : एकीकडे काल देशभरात देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी माेदी यांचा वाढदिवस थाटात साजरा हाेत असतांनाच अख्ख्या विदर्भात बॅल्क गोल्ड सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या चंद्रपूर नगरीत चंद्रपूर जिल्हा कांग्रेस युवक कमिटीच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यांत आला.

याच निमित्ताने शुक्रवार दि.१७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजल्यानंतर स्थानिक बसस्थानक जवळच्या मुख्य मार्गावरुन "माेदीजी राेजगार द्या" अश्या घोषणा देत एक रैली काढण्यांत आली. या रैलीचे नेत्रूत्व खुद्द शिवानी वडेट्टीवार यांनी केले. शेकडाें कार्यकर्त्यासह निघालेली रैली ही ५ वाजताच्या दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडकली.

आम्ही आमच्या पदव्या फक्त एक रुपया विकुन येणां-या रकमेतुन माेदीजींना त्यांचे वाढदिवसा निमित्त एक छान वस्तु भेट पाठवू जेणे करुन ते जाम खुश हाेतील व आमचा हिरावला राेजगार माेदीजी आम्हाला परत मिळवून देतील असे, शिवानी वडेट्टीवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश व्दाराजवळ प्रसार माध्यमांशी बाेलतांना म्हणाल्या. देशातील माेठ माेठ्या कंपन्या बंद हाेण्यांची खंत देखिल त्यांनी आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केली. नंतर युवक काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेंट घेतली. व त्यांना एक निवेदन सादर केले.

या आंदाेलनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व मुख्य मार्गावर पाेलिस प्रशासन तर्फे चाेख बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता काल झालेल्या या आंदाेलनात. शहरातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. एव्हढेच नाही तर आजचे आंदोलन हे चंद्रपूरातील संपूर्ण बेराेजगारात चर्चेचा विषय ठरले.
...असा साजरा झाला चंद्रपूरात राष्ट्रीय बेरोजगार दिवस 🟪 ...असा साजरा झाला चंद्रपूरात राष्ट्रीय बेरोजगार दिवस 🟪 Reviewed by सह्याद्री चौफेर on September 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.