सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१८ सप्टें.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळच्या आदेशानुसार मारेगाव तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या संयुक्त विधामने तालुक्यातील कान्हाळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणामध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व संबंधित कायदे या विषयांवर कायदे विषयक शिबीराचे तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन.पि. वासाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
यावेळी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरीकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ ची माहिती ॲड पि. एम. पठाण यांनी दिली. तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश एस. एन. पि. वासाडे यांनी ज्येष्ठ नागरीकांविषयी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन हजर असलेल्या ज्येष्ठ नागरीकांच्या अडचणी जाणुन त्या अडचणी संबंधित कार्यालयापर्यत पोहचविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. ॲड एम.एम पठाण यांनी ज्येष्ठ नागरीकांच्या सोयी सुविधांसाठी कार्यरत असलेल्या संस्था बरोबरच इतर समाजानेही ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी समोर आले पाहिजे, असे आवाहन केले.
तसेच सर्व शासकीय कार्यालयांनी ज्येष्ठ नागरीकांना मदत करणे आवश्यक आहे. असेही सांगितले यावेळी ॲड कोडापे. ज्येष्ठ पुंडलिक साठे, ठावरी सर या सह तालुका विधी सेवा संघाचे कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कान्हाळगाव येथे जेष्ठ नागरीकांसाठी कायदेविषयक शिबीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 18, 2021
Rating:
