वैष्णीव हत्याकांड प्रकरणातील "त्या" मारेकरास फाशीची शिक्षा द्या - या प्रमुख मागणीसाठी आज चंद्रपूरात कँडल मार्च


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१८ सप्टें.) : अख्ख्या विदर्भात खळबळ उडुन देणां-या चंद्रपूर शहरातील वैष्णीव उर्फ वनश्री आंबटकर हत्याकांड प्रकरणातील त्या आराेपीस फाशीची शिक्षा द्या या प्रमुख मागणीसाठी आज शनिवार दि.१८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीेने कँडल मार्चचे आयोजन करण्यांत आले आहे. अशी माहिती जितेश कुळमेथे यांनी एका संदेशातुन दिलीे.

अत्यंत वर्दळीच्या मार्गावर संध्याकाळच्या वेळेस काही दिवसांपुर्वी प्रफुल आत्राम नावाचे एका ३४ वर्षिय युवकाने एकतर्फी प्रेमातुन वैष्णीव उर्फ वनश्रीवर चाकुने सपासप वार केले हाेते त्यात ती गंभीर जखमी झाली हाेती. तिला उपचारार्थ नागपूरात भरती केले हाेते. परंतु म्रूत्यूशी झुंज देतांनाच तिची प्राणज्याेत दि.१२ सप्टेंबरला रात्री मालवली.

दिवंगत वैष्णीवचे वय अवघे १७वर्षाचे हाेते व ती चंद्रपूरातील एका खासगी रुग्णालयात नर्सचे काम करीत हाेती .आज पंचशिल चाैक इंदिरा नगर येथुन निघणां-या या कँडल मार्च मध्ये सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी हाेण्यांचे आवाहन आयाेजकांनी केले आहे.
वैष्णीव हत्याकांड प्रकरणातील "त्या" मारेकरास फाशीची शिक्षा द्या - या प्रमुख मागणीसाठी आज चंद्रपूरात कँडल मार्च वैष्णीव हत्याकांड प्रकरणातील "त्या" मारेकरास फाशीची शिक्षा द्या - या प्रमुख मागणीसाठी आज चंद्रपूरात कँडल मार्च Reviewed by सह्याद्री चौफेर on September 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.