सह्याद्री न्यूज : किरण घाटे
चंद्रपूर, (१७ सप्टें.) : शहरातील बाबूपेठ परिसरात वास्तव्य करणां-या गरीब कुटुंबातील चाकु हल्ल्यात बळी ठरलेल्या वैष्णीव उर्फ वनश्री आंबटकर या १७ वर्षीय तरुणीचे प्रकरण फास्ट ट्रक काेर्टात चालविल्या जाईल अशी घोषणा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच केली आहे.
या ह्रद्रयद्रावक घटनेने चंद्रपूरातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात खळबळ उडुन दिली हाेती. सदरहु घटनेतील म्रूतक ही अशाेक आंबटकर व शारदा आंबटकर यांची जेष्ठ कन्या असुन, ती शहरातील एका खासगी रुग्णालयात नर्सचे काम करुन कुटुंबाला हातभार लावत हाेती. आंबटकर परिवाराची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे बाेलल्या जाते.
चाकु हल्ल्यात निष्पाप बळी ठरलेल्या तरुणीचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविणार !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 17, 2021
Rating: