मुदखेड येथे केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात भारताचे गृहमंत्री मा.अमित शाह यांच्या हस्ते वृक्ष लागवड
सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (१७ सप्टें.) : अखिल भारतीय वृक्ष लागवड मोहीम २०२१ अंतर्गत केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड येथे भारताचे गृहमंत्री मा.अमित शाह यांच्या हस्ते पिंपळाचे वृक्ष लागवड करण्यात आले आहे.या वृक्ष लागवड मोहीम २०२०-२०२१ अंतर्गत सदर महाविद्यालयातील एक कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम मा.अमित शाह यांच्या हस्ते पार पडला. देशाचा आंतरिक सुरक्षिततेसाठी केंद्रीय राखीव पुलीस बल हे सदैव तत्पर व सक्षम असल्याचेही केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पूढे बोलताना स्पष्ट केले.त्याचप्रमाणे पिंपळाचे वृक्ष आँक्सीजन सोडतो आणि घेतो म्हणून पिंपळ वृक्षाला महत्त्व दिले जाते.
ज्याप्रमाणे सी.आर.पी.एफ.जवान भारत देशाचे रक्षण करित आहेत त्याचप्रमाणे वृक्षांचेही रक्षण केले पाहिजे. असे तेथील उपस्थित जवानांना आवाहन केले.याप्रसंगी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, श्री कुलदीप सिंह(भा.पु.से.)महानिदेशक कें.रि.पु.बल,श्री जुल्फिकार हसन (भा.पु.से.) विशेष महानिदेशक (मुख्यालय) श्रीमती रश्मि शुक्ला अपर महानिदेशक (दक्षिण अंचल), श्री एम. एस .भाटिया महानिरीक्षक (प्रशासन),श्री राकेश कुमार यादव महानिरीक्षक (प्रशिक्षण),श्री एम.जे. विजय उप महानिरीक्षक (प्रशासन), श्री प्रीत मोहन सिंह उपमहानिरीक्षक ग्रुप केंद्र के.री.पु.बल (हैदराबाद),श्री महेश कुमार कमांडेड वी.आई.पी सुरक्षा विंग श्री वी शिवा रामा कृष्णा कमांडेट २ सिग्नल बटालियन कें.रि.पु.बल उपस्थित होते.
मुदखेड येथे केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात भारताचे गृहमंत्री मा.अमित शाह यांच्या हस्ते वृक्ष लागवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 17, 2021
Rating:
