भरलेल्या कर्जा पेक्षाही कमी पिक कर्ज मंजूर


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१२ सप्टें.) : तालुक्यातील माथार्जुन येथील महिला शेतकरी अनुसया आनंदराव आत्राम यांना भरलेल्या कर्जाच्या रक्कमे पेक्षाही कमी पिककर्ज मंजूर केल्याची तक्रार आत्राम यांनी तहसीलदार यांचे कडे केली आहे.

अनुसया आत्राम यांच्या नावावर मौजा माथार्जुन गट क्र.१८२ क्षेत्र ११.७१ हे.आर. सामाईक क्षेत्र शेतजमीन आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा झरी (जामणी) कडून कर्ज मिळावे, या अनुषंगाने गेल्या हंगामातील १ लाख ६२ हजार रुपये कर्जाची परतफेड केली. परंतु येथील शाखा व्यवस्थापक महिलेला १ लाख ५० हजार रुपये पीक कर्ज मंजूर करून अन्याय केला असल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

३ लाखापर्यंत पिक कर्ज मंजूर करणे अपेक्षित असतांना कमी रक्कम पीक कर्ज मंजूर केल्याने शेतीच्या खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार करण्याची वेळ येथील महिला शेतकऱ्यांवर आली आहे.  
भरलेल्या कर्जा पेक्षाही कमी पिक कर्ज मंजूर भरलेल्या कर्जा पेक्षाही कमी पिक कर्ज मंजूर Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.