नागभीड शहरात माेकाट जनावरांचा वाढला उपद्रव, नगर परिषदेला दिले प्रहारने निवेदन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१२ सप्टें.) : दिवसांगणिक चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथे माेकाट जनावरांचा उपद्रव अधिक वाढला असुन, शहरातील प्रभाग ७ मधील महिला अधिक त्रस्त झाल्या आहे. एवढेच नाही तर, रस्त्यांच्या मधाेमध हे माेकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे अपघातांची भिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या बाबत नागभीड येथील प्रहार संघटनेच्या सदस्यांनी नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना काही महिण्यापुर्वी एक लेखी निवेदन सादर केले हाेते, परंतु त्यांचे निवेदनाकडे काेणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविले नसल्याचे प्रहारच्या एका सदस्याने आमच्या प्रतिनिधीस सांगितले. 

प्रभाग ७ मधील वस्तीत भर दिवसाच शेळ्या उन्हात वाळु टाकलेले अन्न धान्य फस्त करीत असल्याची तेथील महिलांची ओरड आहे. या संदर्भात त्यांनी थेट नगर परिषद कार्यालयात जावून तेथील कर्मचा-यांना ठासून सांगितले की, नुकसान करणाऱ्या शेळ्यांचा त्वरित बंदोबस्त करा, अन्यथा आम्हास प्रहारच्या माध्यामांतुन आंदाेलनाचे पाऊल उचलावे लागेल .
 
या वेळी गीता खापर्डे, कविता बारसागडे, उज्वला खोब्रागडे, दीपा खापर्डे आदीं महिला उपस्थित हाेत्या. सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सहानभुतीने लक्ष देण्या ऐवजी ही नगर परिषद या कडे कानाडाेळा करीत असल्याचा चक्क! आराेप येथील महिलांनी केला आहे. या बाबतीत प्रहार संघटना आंदाेलनाची काेणती भूमिका घेतात या कडे साऱ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागभीड शहरात माेकाट जनावरांचा वाढला उपद्रव, नगर परिषदेला दिले प्रहारने निवेदन नागभीड शहरात माेकाट जनावरांचा वाढला उपद्रव, नगर परिषदेला दिले प्रहारने निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.