सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१२ सप्टें.) : तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून कोसळधार पावसाने चांगलीच हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील चिंचमंडळ येथील मुसळधार पावसाने चांगलीच मजल मारली आहे.
सतत च्या पावसाने येथील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कोसळधार पावसामुळे वर्धा नदी लगतच्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी आणि सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यात अनुसया रोहिदास विखनकर, पांडुरंग मारोती दानव, सुनील रोघोबाजी दानव, गजानन महादेव दानव, शालीक मादीकुंडावर, बंडू गणपत पचारे, कमलेश नानाजी नान्हे, चंदा नानाजी नान्हे या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चिंचमंडळ येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरले पाणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 12, 2021
Rating:
