सह्याद्री न्यूज नेटवर्क |
हिंगोली, (१२ सप्टें.) : आज रविवारला मौजे सेंदुरसना येथे हटकर समाज महासंघाची शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर, युवा प्रदेश अध्यक्ष शिवश्री राज हटकर, प्रसिद्धीप्रमुख काशिनाथ निळे सर यांच्या नेतृत्वाखाली व हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिपक चोरमले उपाध्यक्ष माधव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे हटकर समाज महासंघाची प्रथम शाखा स्थापन करण्यात आली.शाखा उद्घाटन नंदकुमार देवकते मा.सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. शाखा अध्यक्ष म्हणून गोरखनाथ देवकते, उपाध्यक्ष आनंद होडबे, कार्याध्यक्ष यशवंत कोपनर, सचिव प्रवीण गोरे, सहसचिव दिलीप ढेकळे, सल्लागार पवन चोरमले, आदीच्या निवडी करण्यात आल्या.
कार्यक्रमाला हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिपक चोरमले, उपाध्यक्ष माधव गडदे, कार्याध्यक्ष सूर्यकांत नरोटे, सचिव मारुती शिंदे, निरीक्षक सुभानराव देवकते, औंढा तालुका अध्यक्ष प्रल्हाद पोले, उपाध्यक्ष धोंडजी ढेकळे, वसमत तालुका उपाध्यक्ष रामेश्वर पोले, हिंगोली तालुका उपाध्यक्ष नवनाथ काचगुंडे, तसेच कार्यक्रमाला बालाजी पाटील, गोरखनाथ सापनर, उत्तमराव काळे, बंटी जाधव, गजानन देवकते, माणिक देवकते, चांदोजी चोरमले, तुकाराम लोहटे, संदीप पोले, कल्पेश पोले, विलास सुपनर, मारोती मोगले, सुर्या सुर्यतळ, प्रशात गोरे आदी हजर होते.
सूत्रसंचालन देवराव सुपनर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल देवकते यांनी केली.
सेंदुरसना येथे हटकर समाज महासंघाची शाखा उदघाट्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 12, 2021
Rating:
