लाईनमनची गळफास घेवून आत्महत्या


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१३ सप्टें.) : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोन्सा येथे एका लाईनमनने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किशोर बंडू भोसकर (३५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की, किशोर बंडू भोसकर हा कुंभारखनी येथील रहिवाशी होता. तो लाईनमन म्हणून काम करायचा. मुलगी व पत्नीसह तो घोन्सा येथे राहत होता. सध्या त्यांची पत्नी गर्भवती असल्याने ती डिलेव्हरीसाठी मुलीला घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे किशोर घरी एकटाच असायचा. आज संध्याकाळी ६.०० वाजताच्या सुमारास किशोरने घराच्या छताच्या हुकला दोरीने गळफास लावला. दरम्यान, काही वेळाने ही घटना शेजारीच राहत असलेल्या त्यांच्या भावाला कळली. त्यांनी त्वरित याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार अनिल सकवान, नाहिम शेख, होमगार्ड प्रज्योत ताडुरवार हे पोलीस वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरीता वणी येथे पाठविला आहे. किशोरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार अनिल सकवान व संजय खांडेकर करीत आहे.
लाईनमनची गळफास घेवून आत्महत्या लाईनमनची गळफास घेवून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on September 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.