सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९सप्टें.) : लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पुरेपूर जाणीव असतांना देखिल एका मेडीकल फार्मवर स्वाक्षरी करण्यांसाठी चक्क पन्नास हजार रुपयांची लाच मागणा-या चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन यशस्विरित्या (काल मंगळवारी) जाळ्यात अडकविले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरात चांगलीच खळबळ उडाली असुन, अगदी क्षुल्लक कारणांसाठी एवढी माेठी रक्कम मागणे ही एक आश्चर्य कारक बाब असल्याची चर्चा सर्व सामान्य जनतेतुन ऐकावयास मिळाली. या पूर्वी सुध्दा अश्या लाचखाेरांवर चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी व त्यांचे पथकांनी यशस्विरित्या कारवाया केल्या आहे. हे येथे विशेष उल्लेखनिय आहे.
उपरोक्त प्रकरणामुळे वैद्यकीय महाविद्यालय परत एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. सध्या या घटनेची गावभर चर्चा सुरु आहे.
लाच घेणारा लिपिक लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2021
Rating:
