उच्च शिक्षित तरुणीने प्रेमास नकार देताच "त्याने "केली तिची व्हाट्सअप व फेसबूकच्या माध्यमांतुन नाहक बदनामी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९सप्टें.) : एका उच्च शिक्षित तरुणीस प्रथम मैत्रिचे मधुर व गाेड संबंध जाेडुन नंतर बळजबरीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून बघणां-या ग्रामीण भागातील एका युवकास चंद्रपूर जिल्ह्यातील पडाेली पाेलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या संबंधात पिडीत युवतीने उपराेक्त तरुणाच्या विरुध्दात पाेलिस स्टेशनला ताेंडी तक्रार केल्या नंतर पाेलिसांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ आराेपी साजन उर्फ सूरज सातपुते यास ताब्यात घेतले आहे. सदरहु घटनेतील आराेपीचे वास्तव्य पडाेली नजिकच्या नागाळा येथील असल्याचे चाैकशी अंती कळले. घटनेतील आराेपी हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असुन, ताे सध्या ग्राम पंचायत नागाळ्याचा उपसरपंच असल्याचे समजते.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार असे समजते की, स्थानिक डाँ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पिडीत तरुणींची साजन उर्फ सुरजची ओळख झाली .नंतर मैत्रि संबंधातुन दिवसांगणिक त्यांची आेळख अधिक वाढत गेली .याच संधीचा फायदा घेत तरुणांने काही दिवसांने पिडीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात आेढण्यांचा प्रयत्न केला परंतु सुशिक्षित परिवारातील या तरुणीने चक्क त्याचे प्रेमाला नकार दिला .तेव्हा या युवकांने तिला विविध प्रकारच्या धमक्या देवून तिच्यावर दबाव टाकण्यांचा प्रयत्न केला .ताे एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिला व्हाँटसअप व फेसबूकच्या माध्यमांतुन नाहक बदनाम करण्यांचा प्रयत्न देखिल केला. शेवटी तिने ही बाब परिवारातील सदस्यांना सांगितली नंतर तिने पडाेली पाेलिस स्टेशन गाठुन त्याचे विरुध्द तक्रार दाखल केली.

पडाेलीचे कर्तव्य दक्ष पाेलिस अधिकारी काेंडावार यांनी या प्रकरणात चाैकशी करुन आराेपीस अटक केली व आराेपीवर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले. दरम्यान, पाेलिसांनी त्याचा माेबाईल जप्त केला आहे. अश्या घटना टाळण्यांसाठी समाजातील तरुणींनी मनात कुठलीही भिती न ठेवता हिंमतीने पुढे आले पाहिजे असे आवाहन पडाेलीचे पाेलिस निरीक्षक महेश काेंडावार यांनी केले आहे.
उच्च शिक्षित तरुणीने प्रेमास नकार देताच "त्याने "केली तिची व्हाट्सअप व फेसबूकच्या माध्यमांतुन नाहक बदनामी ! उच्च शिक्षित तरुणीने प्रेमास नकार देताच "त्याने "केली तिची व्हाट्सअप व फेसबूकच्या माध्यमांतुन नाहक बदनामी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.