कृषिदुताकडून ई-पिक पाहणी अप्लिकेशनची नोंदणी व फायदे संदर्भात मार्गदर्शन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
नरखेड, (२९ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, कोंघारा, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) 2021-22 अंतर्गत विद्यार्थी शुभम सुरेशराव आगरकर याच्या पुढाकाराने तसेच महसूल विभाग आणि कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ई-पीक पाहणी अप्लिकेशन नरखेड तालुक्यातील भिष्णूर या गावात अप्लिकेशनची नोंदणी आणि उपयोग, फायदे, याबाबात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये ई- पीक पाहणी अॅप्लिकेशनच्या नोंदणीपासून तर पीक पेरा कसा नोंदवावा,पिकांची अचूक नोंदणी कशी करावी, त्याचे भविष्यात होणारे फायदे, छायाचित्र काढणे, इत्यादीबद्दल कृषिदूताने मार्गदर्शन केले. या माहिती कार्यक्रमादरम्यान भिष्णूर गावातील संदीप आगरकर, सुनील वरुडकर, आदी लोकांचे सहकार्य लाभले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. शुभम शिरपूरकर, प्रा. दत्ता जाधव, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. स्नेहल आत्राम, प्रा.पल्लवी येरगुडे, प्रा. काजल माने,प्रा. कृतिका इंझाळकर आदि शिक्षकांचे या विद्यार्थ्याला मार्गदर्शन लाभले.
कृषिदुताकडून ई-पिक पाहणी अप्लिकेशनची नोंदणी व फायदे संदर्भात मार्गदर्शन कृषिदुताकडून ई-पिक पाहणी अप्लिकेशनची नोंदणी व फायदे संदर्भात मार्गदर्शन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.