सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (२९ सप्टें.) : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई द्वारा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांना,लोकांची समाजाची सेवा करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये निराधार,राशनची कामे,विधवांना आर्थिक सहाय्य असेल,गावातील रस्ते,पुलाचा प्रश्नांची राजमानवधिकार आयोगाकडे केलेली तक्रार असेल यासाठी रस्त्यावर येऊन उपोषणापर्यंत मजल मारणारे तसेच आपण 'ज्या समाजात जन्मलो त्याचे काहीतरी देणे बाकी असते' हा मानवतेचा संदेश घेऊन कोरोनाच्या अतिबिकट अशा परिस्थितीत मुलांना मोफत शिकवणी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन इत्यादी कामे करणारा हा युवक म्हणजे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२१ चा प्राप्त करणारा युवक सन्मा.धनंजय विनोद आसुटकर हा लहानशा खेडेगावातून आपल्या तमाम युवा वर्गाला आदर्श ठरणारच आहे. ग्राउंड लेव्हल वर काम करण्याची डोळस प्रवृत्ती,समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन व जात,धर्म,पंथ, संप्रदाय हे सगळे बाजूला सारून मानवाची भूमिका जपणारी भावना प्रत्यक्षात कृतीत यायला पाहिजे. हा दृष्टीकोन विचारात घ्यावा. हा या पुरस्कारा मागचा उद्देश समजून हा पुरस्कार समाजाप्रती मला काम करण्याची प्रेरणा देईलच. "सह्याद्री न्यूज" नेटवर्क परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा..!!
धनंजय आसूटकर राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने (2021) सन्मानित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2021
Rating:
