८ जणांकडून घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वरोरा, (२९ सप्टें.) : वरोरा तालुक्यातील टाकळी येथील मनीषा दीपक खारकर ह्या घरी एकटी असतांना काही समाजकंटक रवी खारकर, प्रवीण खारकर, वसंत खारकर, मनोहर खारकर, किसन खारकर, अक्षय खारकर, दशरथ खारकर आणि राहुल खारकर यांनी कट रचून जबरदस्तीने घरात घुसून मारहाण करून सदर महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असे, आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या सुनीता गायकवाड, वर्षा भोंगे, आणि पीडितांनी आरोप करीत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेत राहुल नेताजी खारकर, विठ्ठल खारकर, नितेश गाडगे, सचिन गुप्ता व महेश गरपल्लीवार हे उपस्थित होते.

मारामारी दरम्यान, गावातील काही लोकांनी बाईला दुचाकी वर वरोरा पोलीस ठाण्यात आणले, तिच्या  पतीला सुद्धा आणले, त्यानंतर आमची चौकशी केली नाही आणि शासकीय रुग्णालयात डोक्यावर 10 टाके घातले आणि हातावर 2 टाके घातले व चंद्रपूर पाठवले.
या गंभीर घटनेची पोलीस प्रशासनाकडून किरकोळ वेदना नोंदवली गेली. रात्री 2:10 वाजता त्यांना वार्ड क्र. 17 आणि पतीला वार्ड क्र. 7 मध्ये भर्ती केले. तीन दिवस रक्तस्त्राव सुरू असतांनाही पोलिसांनी चौकशी न करता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. जमादार गाडगे यांनी ही गंभीर घटना  टाकळीमध्ये घडली असतांना, खापरीमध्ये घटना घडली असे सांगितले. हे प्रकरण पोलीस अधीक्षकांना कळवल्याची माहिती मिळताच त्यांनी आरोपींना जामीनही दिला. त्यामुळे जमादार, डॉक्टर यांच्या चौकशीची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

८ जणांकडून घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न ८ जणांकडून घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न Reviewed by सह्याद्री चौफेर on September 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.