सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९सप्टें.) : जिल्ह्याच्या मुल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील पिपरी दिक्षित येथील एका टँक्टरच्या विचित्र अपघात एका अल्पवयीन तरुणींचा हकनाक जिव गेल्याची दुखद घटना आज घडली या बाबत असे कळते की पिपरी दिक्षित येथील शितल खुशाबराव देवतळे यांचा मालकीचा ट्रैक्टर क्रमांक एम एच ३४बिएफ १६६४ हा गावातील एका वर्दळीच्या मार्गावर ठेवण्यांत आला हाेता त्या वेळी या ट्रँक्टर जवळ ट्रँक्टरचा चालक हजर नव्हता. कुणी ट्रँक्टर जवळ नसतांनी गावातील काही मुले मुली त्या ट्रँक्टर खेळु लागली हाेती अश्यातच रस्त्यावर उभे असलेले ट्रँक्टर मागे येवू लागले. त्यातच मुले मुली आपला अमुल्य जिव वाचविण्यांच्या प्रयत्नात इकडे तिकडे सैरावैरा पळु लागली पण तिथे असलेली वैष्णवी मनाेज ढाेंगे नावाची ही नव वर्षीय अल्पवयीन मुलगीआपला प्राण वाचविण्यात या वेळी अपयशी ठरली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे. विशेष म्हणजे अवैध रेती वाहतुक प्रकरणात सदरहु ट्रैक्टर मालकावर महसुल विभागाने अनेकदा दंडात्मक कारवाया केल्या असल्याचे गावात बाेलल्या जाते.
ट्रॅक्टरने घात केला, अल्पवयीन वैष्णीवचा जिव गेला; मूल तालूक्यातील घटना🟪
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2021
Rating:
