टॉप बातम्या

पांढरकवडाच्या आर्यन वाघमारे नवोदय परीक्षेत मारली बाजी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२९ सप्टें.) : पांढरकवडा येथील ईरा इंग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षण घेत असलेला आर्यन नितीन कुमार वाघमारे यांनी वर्ग ६ च्या प्रवेशासाठी नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पात्र परिक्षेत यशस्वी झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांची जणु mpsc असलेली ही कठिण स्पर्धा परिक्षा चाणाक्ष आर्यनने यशस्वी पार केली.

तो आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य श्री देशपांडे सर, वर्गशिक्षिका कु. शेरीज मॅडम, आपले आई वडिल व भाऊ साहिल यास दिले. पुढे आणखी स्पर्धा परिक्षेव्दारे प्रशासकीय सेवेत येवून देशसेवा करण्याचा त्याचा मानस आहे. त्याचे जिद्द, ध्येय, बघून ईरा इंग्लिश मिडीयम स्कूल सर्व शिक्षक व शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षा करण्यात येत आहे.
Previous Post Next Post