सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वडसा, (२९ सप्टें.) : दि.२६ सप्टेंबर ला झाडीपट्टीतील रंगकर्मींची सभा आमगाव येथे जेष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत झाडीपट्टीतील शेकडो रंगकर्मी उपस्थित होते. समस्त कलावंतांच्या वतीने कलावतांच्या हितासाठी "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद" ची स्थापना करण्यात आली.
यात अध्यक्ष म्हणून शेखर पटले, तर सचिव पदासाठी मुकेश गेडाम यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारीणीत परिषदेचे ऊपाध्यक्ष म्हणून किरपाल सयाम, प्रियंका गायधने, किशोर भाग्यवंत, देवा कावळे सहसचीव म्हणून ज्ञानेश्वरी कापगते, वासुकुमार मेश्राम, सुनील कुकुडकर, दुधाराम कावळे तर सदस्य म्हणून शेरु खान, विनोद काळे, प्रतिभा साखरे, शंभुदेव मुरकुटे, ऊत्तम ऊके, लालचंद पुंगाटे, कोषाध्यक्ष शंतनु कुळमेथे यांची निवड करण्यात आली..
सदर परिषदेचे सल्लागार-मार्गदर्शक म्हणून झाडीपट्टीचे जेष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुने, अंबादास कामडी, प्रा.डॉ.दिनकर चौधरी, डॉ.प्रवीण सहारे यांची निवड करण्यात आली.
प्रसिद्धी प्रमुख राहुल पेंढारकर, मंगल मशाखेत्री, होमदेव कोसमशीले हे काम सांभाळतील.
सभेचे संचालन राहुल पेंढारकर, प्रास्ताविक देवा कावळे तर, आभार किरपाल सयाम यांनी मानले.
निवड प्रक्रीया प्रमुख म्हणून प्रा.डॉ.दिनकर चौधरी, तर सहप्रमुख म्हणून डॉ.प्रवीण सहारे यांनी ऊत्तम नियोजन करुन अविरोध निवडप्रक्रीया पार पाडली.
अखिल झाडीपट्टी नाट्य परिषद ही झाडीपट्टीतील कलावंतांच्या पाठीशी ऊभी राहुन झाडीपट्टीच्या विकासासाठी नक्कीच कटीबद्ध असेल, असे परिषदेच्या वतीने उपस्थित रंगकर्मींना विश्वास देण्यात आला.
निवड केलेल्या कार्यकारीणी मंडळास झाडीपट्टीतील अनेक रगकर्मींनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
झाडीपट्टीत "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परीषदेची स्थापना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2021
Rating:
