पंचायत समिती पांढरकवडा रोह्याया घोटाळ्यात चौकशीचा आला वैग


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२९ सप्टें.) : पांढरकवडा पंचायत समिती मधील रोह्याचा कामात ५४ कोटीचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार खुद्द माजी सभापती सौ. इंदुताई मिसेवार व काही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमुन चौकशी करण्यात आल्यानंतर भ्रष्टाचार उघडकीस सुध्दा आला होता. पं.स. चा एका तत्कालीन पदाधिकारी या रोहयो भ्रष्टाचाराचा मास्टर माईंड असल्याची चर्चा आहे. चौकशी समितीने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यासह एक डझन पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांना दोषी ठरविण्यात आले होते. शिवाय काही राजकीय ठेकेदारांची सुध्दा नावे चौकशी समितीने रेकॉर्डवर घेतली होती. केंद्र व राज्य शासनाकडुन आलेल्या निधीतुन कामे केलेल्या ठिकाणी पुन्हा रोहयोची कामे दाखवुन लाखो रुपयांची देयके कामे न करताच संबधित ग्रामसेवक, अभियंत्याच्या सहकार्यान राजकीय ठेकेदारांनी उचल केली होती. चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पं.स.च्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यासह अनेकांना निलंबित करण्यात आले होते. शिवाय काहींवर रिकहरी सुध्दा काढण्यात आली. मात्र सदर प्रकरणातील मुख्य दोषी असलेल्या राजकीय ठेकेदारांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.

गेल्या एक दिड वर्षापासुन प्रकरण थंड बस्त्यात असतांनाच काल २७ रोजी अचानकपणे
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी येथे धडक देवुन माजी सभापतीचे बयाण नोंदविले. शिवाय पं.स. कार्यालयात जावुन गटविकास अधिकाऱ्याकडे विविध कागदपत्राची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीने पुन्हा एकदा जोर पकडल्याचे दिसुन येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा येथे भेट देवुन तक्रार कर्त्यांची जबानी तथा कागद पत्राची जुळवा जुळव सुरु केल्याने या प्रकरणातील दोषी राजकीय ठेकेदारांचे धाबे दणाणल्याचे दिसुन येत आहे. प्राप्त माहिती नुसार ईतर तक्रार कर्त्यांचे सुध्दा आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी बयान नोंदविणार आहे.
पंचायत समिती पांढरकवडा रोह्याया घोटाळ्यात चौकशीचा आला वैग पंचायत समिती पांढरकवडा रोह्याया घोटाळ्यात चौकशीचा आला वैग Reviewed by सह्याद्री चौफेर on September 29, 2021 Rating: 5
Powered by Blogger.