मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करण्याची काँग्रेसची मागणी
सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (२९ सप्टें.) : आज मुदखेड तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सतत झालेल्या पाच दिवसाच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयाची सरसगट मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आली.
यावेळी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पाटील पवार, शहराध्यक्ष माधव पाटील कदम, नगरसेवक उत्तमराव चव्हाण, इम्रानसेठ मच्छेवाले, नितीन चौदंते, रमेश बोडके, चांदु चमकुरे, बजरंग खोडके, मुजिब पठाण, चांदु बोकेफोड, कुनाल चौदते, रावसाहेब चौदंते, कैलास चंद्रे, नागोराव भांगे, आनंदराव पा.पवार, बंदि अली खान पठाण, करीम खान साब, राजू बोकेफोड, अविनाश हाटकर, बालाजी सूर्यवंशी, बबलू शेठ, संभाजी भांगे, शुभम कल्याणे, आकाश मुंगल, उत्तमराव जनजवळे, व्यंकटी पवार, भुजाजी पवार, रंगराव पा. पवार उपस्थित होते.
मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करण्याची काँग्रेसची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 29, 2021
Rating:
